भौ, लय रंगेल मी,
स्वप्नाचा भंगेल मी।
अख्खे-अख्खे दिस काढले,
फक्त बिड्या-काड्यावर।
माया इस्टेटीचा गधं येतो,
थेट तिच्या वाड्यावर।
माया प्रत्येक माडीले,
नोटांचा साज होता।
लोळत होते गरीब समोर,
इस्टेटीचा माज होता।
फडकत होता माझाच झेंडा,
इथल्या प्रत्येक गाड्यावर।
माया इस्टेटीचा गधं येतो,
थेट तिच्या वाड्यावर।
बायको मायी देवी होती,
संस्काराची ठेवी होती।
परकीनं लळा लावला,
वासनेचा मळा लावला।
मी तिच्यात भुलत गेलो,
सोन्याचा लेप लावला,
तिच्या प्रत्येक साड्यावर।
माया इस्टेटीचा गधं येतो,
थेट तिच्या वाड्यावर।