लयच लईन देत होती,
पल्याडली बाई।
मी पण ठरवलं,
आता थांबायचंच नाही।
आरसा अन फणी,
ती बसली घेऊन दारात।
लयच मजा येईल म्हतलं,
आज रविवारात।
तशी ती पोट्टीच,
पण आज साडी घालून बसली।
पल्याडून मले,
ती लयच खास दिसली।
गालातच हसायची,
तिची लकब ही नवी।
तशी नव्हती अनोळखी,
ती नावानं "सवी"।
मी हातानं खुणावलं,
ती म्हणे नाही।
अन लयच लईन देत होती,
पल्याडली बाई।
एक दिवस आली
तिची उडत उडत ओढणी।
आतातरी बसन म्हतलं,
प्रेमाची फोडणी।
ओढणी मागासाठी,
ती आली अशी लाजत।
माया मनात प्रेमाची,
मग भाकर होती भाजत।
ओढणी देता देता,
मी हात असा धरला।
इच्छा असन तं जीवनभर,
म्हतलं येतं का घरला?
मंग तं भौ ती,
लयच लय लाजली।
कडक झाला पोपडा,
अन भाकर लयच भाजली।
म्हणे हृदय देते होकार,
पण मन म्हणते नाही।
अन लयच लईन देते मले,
पल्याडली बाई।
मी खट्याळ नाऱ्या,
थोडं हात धरून ओढलं।
तिच्या नकाराचं गाठोडं,
मग अलगदच सोडलं।
दर दर हप्त्याले म्हतलं,
तुले घेऊ घेऊ मिरवीन।
अन "खंडाळ्याच्या घाटात",
तुले प्रेमानं फिरवीन।
"कळसुबाई" वर जाऊन,
तुयीच फुगे उडवीन।
"खंबाटकी घाट" पण,
पैदलच तुडविन।
मग नकाराचं हळूहळू,
होकारात जमवलं।
बघा खट्याळ नाऱ्यानं,
कसं मिनिटात नमवलं।
मग परत ती लाजली,
श्वास झालेत गरम।
मले पण हळूहळू,
येऊ लागली शरम।
मग हो म्हणली ती,
पळाली म्हणत "आई"।
अन लयच लईन देते मले,
पल्याडली बाई।
लग्नाले आमच्या,
आता चार वर्षे झाले।
अन लग्नानंतर प्रेमाले,
वेगळेच दिवस आले।
डल्ल झाला नाऱ्या।
आता समजत नाही **ट,
घरातच कळसुबाई,
अन खंडाळ्याचा घाट।
तालुक्याचा चौक सोडून,
कुठेच नाही फिरला।
अन "कळसुबाई" चा फुगा,
घरातच जिरला।
पल्याडली बाई।
मी पण ठरवलं,
आता थांबायचंच नाही।
आरसा अन फणी,
ती बसली घेऊन दारात।
लयच मजा येईल म्हतलं,
आज रविवारात।
तशी ती पोट्टीच,
पण आज साडी घालून बसली।
पल्याडून मले,
ती लयच खास दिसली।
गालातच हसायची,
तिची लकब ही नवी।
तशी नव्हती अनोळखी,
ती नावानं "सवी"।
मी हातानं खुणावलं,
ती म्हणे नाही।
अन लयच लईन देत होती,
पल्याडली बाई।
एक दिवस आली
तिची उडत उडत ओढणी।
आतातरी बसन म्हतलं,
प्रेमाची फोडणी।
ओढणी मागासाठी,
ती आली अशी लाजत।
माया मनात प्रेमाची,
मग भाकर होती भाजत।
ओढणी देता देता,
मी हात असा धरला।
इच्छा असन तं जीवनभर,
म्हतलं येतं का घरला?
मंग तं भौ ती,
लयच लय लाजली।
कडक झाला पोपडा,
अन भाकर लयच भाजली।
म्हणे हृदय देते होकार,
पण मन म्हणते नाही।
अन लयच लईन देते मले,
पल्याडली बाई।
मी खट्याळ नाऱ्या,
थोडं हात धरून ओढलं।
तिच्या नकाराचं गाठोडं,
मग अलगदच सोडलं।
दर दर हप्त्याले म्हतलं,
तुले घेऊ घेऊ मिरवीन।
अन "खंडाळ्याच्या घाटात",
तुले प्रेमानं फिरवीन।
"कळसुबाई" वर जाऊन,
तुयीच फुगे उडवीन।
"खंबाटकी घाट" पण,
पैदलच तुडविन।
मग नकाराचं हळूहळू,
होकारात जमवलं।
बघा खट्याळ नाऱ्यानं,
कसं मिनिटात नमवलं।
मग परत ती लाजली,
श्वास झालेत गरम।
मले पण हळूहळू,
येऊ लागली शरम।
मग हो म्हणली ती,
पळाली म्हणत "आई"।
अन लयच लईन देते मले,
पल्याडली बाई।
लग्नाले आमच्या,
आता चार वर्षे झाले।
अन लग्नानंतर प्रेमाले,
वेगळेच दिवस आले।
डल्ल झाला नाऱ्या।
आता समजत नाही **ट,
घरातच कळसुबाई,
अन खंडाळ्याचा घाट।
तालुक्याचा चौक सोडून,
कुठेच नाही फिरला।
अन "कळसुबाई" चा फुगा,
घरातच जिरला।