(शेकडो वर्षापूर्वी)
दंत-कथेनुसार शांततेचे प्रतीक असलेल्या कालवंश साम्राज्यातील शांतता जवळजवळ अस्ताला पोचलेली होती. त्यांच्याच जमातीतील एक क्रूर सेनापती "कालभुज" हा कालवंशाला फितूर झाला होता. त्याची पत्नी "कालनंदिनी" ही अनेक दिवसांपासून "काल-सम्राज्ञी" बनण्याचे दिवास्वप्न पाहत होती. आपला पती "कालभुज" हा कालवंशात जेष्ठ असूनही केवळ त्याच्या क्रूर स्वभावामुळे त्याचे "कालसाम्राट" पद डावलण्यात आलेले होते. तेंव्हापासून राजदरबारातील मंत्र्यांविषयी तिला भयंकर चीड होती. आपल्या पतीला "कालमुकुटाचे" अमिश दाखवून कालवंशाच्या फुटीरतावादाचे बीज पेरण्याचे काम ती प्रत्येक संधीत करत होती. या अफाट काल साम्राज्याची सूत्रे तिला आपल्या हाती हवी होती.
दंतकथेत उल्लेख केलेला "कालमुकुट" हा साधारण मुकुट नव्हता. आतापर्यंत युद्धात रणभूमीवर गतप्राण झालेल्या कालवंशातील अतिशय शूर राज्यांच्या अस्थी-ने मढविलेला तो कालमुकुट जीवापाड जपला जात होता. विशिष्ट तंत्र-मंत्राणे मुकुट भारले जात होते. विविध पक्षांची पिसे त्या कालमुकुटाची शोभा वाढवत होते. खळखळ आवाज करणाऱ्या, घुंगरात गुंफलेल्या सुवर्ण-साखळ्या त्या कालमुकुटाच्या बाजूला जणू नृत्य करीत होत्या. अनंतात विलीन झालेल्या कालवंशातील जेष्ठ शूर सम्राटाची कवटी त्या कालमुकुटावर शोभून दिसत होती. त्या कवटीतील दोन्ही डोळ्याच्या खोबणीवरील वरच्या बाजूला काळ्या ठिपक्यांची रांग भयावह दिसत होती.
कालमुकुटाची आतील बाजू कितीही मोठ्या आघातापासून डोक्याचे सरंक्षण करण्यास सक्षम होती. डोक्याच्या आतल्या बाजूचे सरंक्षण कवच आणि कालमुकुटाच्या वरच्या बाजूच्या कवचादरम्यान हवेची एक पोकळी तयार झालेली होती. ज्यामध्ये अतिशय मृदू, कोमल असे कापडही होते. मुकुटासभोवती हवेवर डोलणारी हाडात रुतवलेली रंग-बेरंगी पिसे कालसाम्राट "कालविक्रम" ला एक वेगळीच ओळख करून देत होती.
जीवांची पर्वा न करता पिढ्यान पिढ्या त्या कालमुकुटाचे रक्षण केले जात होते. तो "कालमुकुट" विशिष्ट विधिनुसार जो व्यक्ती धारण करत असे त्यालाच "कालवंशाचा राजा" म्हणून मान्यता मिळत असे.
"कालमुकुटासाठी" "कालभुज" ने आपल्या भावाचाच संहार करण्याचे ठरवले. येणारी अमावस्या हीच त्यासाठी योग्य वेळ ठरून तसे बेत राखण्यास त्याने सुरुवात केली होती. "कालभुज हा अतिशय लोभी व महत्वकांक्षी होता. धिप्पाड पीळदार शरीर, हत्तीसारखी ताकत असणारा, अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्ता लाभलेला कालभुज "कालमुकुट" बघून जळत होता. ते मुकुट त्याच्या डोळ्यात सलत होते. काहीही करून कालमुकुट हस्तगत करायचाच हा त्याचा मानस होता.एका हप्त्यातच त्याने आपल्या राजदरबारातील काही फितूर सेनानी हेरले होते. एक-एकाला उच्च पदाचे अमिश दाखवून तो आपल्या प्रवाहात दाखल करून घेत होता. बघता- बघता ती वेळ आली. अनेक दिवसांपासून आपल्या नजरेत सलणारा तो कालमुकुट मिळवण्याचा तो दिवस होता.
काल-साम्राज्यातील गुप्तहेरांना सुगावा लागला. पण वेळ निघून गेली होती. "कालभुज" ने आपल्या भाऊ "कालविक्रम" चा शिरच्छेद केला" आघात एवढा जबरदस्त होता की त्याचे शीर "कालमुकुटासह" दूर जाऊन पडले. तसा सम्राटाच्या रक्षकांचा घोळका कालभुज वर तुटून पडला. "कालभुज" ने दूर गेलेला कालमुकुट फितूर सेनापती ला हस्तगत करण्यास सांगितले. आणि तो मात्र राक्षकासोबत चार हात करण्यातच गुंतून राहिला. सम्राट कालविक्रम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे सर्व बघून घणाघाती सुरू झाली.
दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीराच्या तुकड्याची हत्तीवरून राज्यात धिंड काढली होती. परंतु कलमुकुट हस्तगत करण्यात मात्र "कालभुज" असफल झाला होता. कालवंशातील काही चतुर सैनिकांनी कालमुकुट घेऊन पलायन केले होते. त्यांनी कलमुकुट हा एका गुप्त ठिकाणी ठेवला होता. कालमुकुट प्राप्त करण्यासाठी कालराज "कालभुज" ने शेकडो काल-सैनिकांना प्रजेसमोर जिवंत जाळले होते. कालमुकुटाची माहिती देणाऱ्यांना लाखो सुवर्ण-मुद्रा बक्षीस म्हणून ठेवलेल्या होत्या. कालमुकुटाच्या रक्षणासाठी शेकडो कालसैनिक हसत हसत अग्नी-मुखी गेले. प्रजेवरही तोच अत्याचार. साम, दाम, दंड, भेद नीती वापरूनही "कालभुज" ला तो कालमुकुट प्राप्त करता आला नाही. तो "कालमुकुट' प्राप्त करण्याचे एक आणखी आणि सर्वात महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे "काल-भांडर".
कालवंशातील कितीतरी पिढ्याने आतापर्यंत मिळवलेला मौल्यवान खजीना, कालवंशातील गुप्त माहिती, नकाशे. आणि विशेष म्हणजे महाविध्वंसक असा शस्त्रसाठा हा "कालभांडारात" ठेवलेला होता. त्या काल-भांडाराच्या चाव्या ह्या त्या "कालमूटामध्ये" तुकड्यांच्या स्वरूपात दडलेल्या होत्या.
दंतकथेनुसार " काल-भांडारात काही गुप्त शक्तीही दडलेल्या होत्या. असे म्हटले जात होते की, कथित सुप्त शक्तीला जागृत करणे हे महाविनाशाला आमंत्रित करण्यासारखे होते. संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्याचे सामर्थ्य त्या शक्तिमध्ये दडलेले होते. त्या सुप्त शक्तीला प्राप्त करून घेणारा व्यक्ती सर्वशक्तिमान होत होता. विशिष्ट दिवशीच त्या महाकाय शक्तीची उपासना "कालवंशाकडून" केली जात होती. ढोल, नगारे वाजवून "काल-नितीनुसार" त्या शक्तीला फक्त पशु-बळीच दिले जात होते.
कालभुज ने क्रूरतेचा कळसच गाठला होता. त्याच्या क्रूरतेच्या भीतीपोटी कालवंशातील जमात छोट्या छोट्या गटाने जंगलाचा आश्रय घेऊन राहत होती. हजारो गुप्तहेर लावूनही "कालभुज" ला त्या कालमुकुटाचा थांगपत्ता लागत नव्हता.
दंतकथेनुसार "कालभुज" हा अत्यंत महत्वकांक्षी होता. त्याच्या क्रूरतेचा महिमा एवढा भयावह होता की तो बंदी केलेल्या सैनिकांचे शिरच्छेद करून राजवाड्यात त्याचे तोरणे बांधत असे. जंगलात आश्रय घेऊन राहणाऱ्या आपल्या जमातीतील लोकांना मारण्यासाठी तो जंगलांना आग लावून देत होता. आपल्याला साथ देणाऱ्या गुलामांना मात्र काहीच कमी पडू देत नव्हता. त्याच्या शूर सैनिकांना त्यांच्या शौर्याबद्दल इनाम म्हणून त्यांच्या वजनाइतक्या मुद्रा बक्षीस म्हणून देत होता. त्याला येऊन मिळणाऱ्या शत्रूच्या सैनिकांना तर तो विशेष बक्षीसेही द्यायचा. त्यामुळे त्याचे सैनिक दल वाढतच जात होते. सैनिकांच्या आणि शस्त्रांच्या अफाट संख्येमुळे आजू-बाजूंची छोटी-मोठी राज्येही लयास चालली होती. आजूबाजूंच्या शेकडो राज्यांना एकत्र करूनही कालसम्राट "कालभुज" शी चार हात करण्याची हिम्मतही कोणी करत नव्हते. कितीतरी राज्ये भयाण पडली होती. आजही कालभुज ला एकच खंत वाटत होती. ती म्हणजे "कालमुकुट".
काळ बदलला. राज्यावर दुष्काळाचे सावट घोंगावू लागले. जमिनी उजाड झाल्या. युद्धतील प्रेतांमुळे रोगराई पसरली. निसर्ग-देवतेला प्रसन्न करण्यासाठी "काल-नीतीला" डावलून शेकडो शेतकऱ्यांचे नर-बळी दिले जाऊ लागले. नरबळीच्या भीतीपोटी लोक पसार झाले. शेकडो स्त्रिया विधवा झाल्या. आपल्या राज्याच्या परिस्थिती साठी "कालभुज" ने आसपासच्या छोट्या-छोट्या राज्यावर अनेक जाचक कर लादले. त्यांची लूटमार सुरू झाली. काही कालावधी ने परिस्थिती पूर्वरत झाली.
इकडे दंतकथेनुसार उल्लेख केलेला "विजयगड" साम्राज्याचा राजा " विजयराज" हेच "कालभुज" च्या अफाट शक्ती ला भेदारलेल्या छोट्या मोठ्या राज्यांचा आधारस्तंभ होता. उच्च प्रशिक्षण, कामालिची शिस्तप्रियता, अतिशय शूर सैनिकांच्याच प्रशिक्षित तुकड्या. जिद्द, चिकाटीच्या जोरावर शेकडो पटीने जास्त सैनिक असलेल्या शत्रुलाही सहज मात देण्याची क्षमता. आणि विशेष म्हणजे अभेद्य अशी असाधारण रणनीती.
" विजयगड" साम्राज्य हे तिन्ही बाजूनी विशाल टेकड्यानी वेढलेले होते. पूर्वेकडे अभेद्य असे विशाल राज-द्वार होते. राजद्वारासमोर विशाल असे गनिमी युद्धनीतने तयार केलेले रणांगण होते. त्या रणांगणात नवनियुक्त सैनिकांच्या रोज कवायती होत असत. ...
क्रमशः...